Suicide by burning electricity consumer due to Increased power bill  
नागपूर

धक्कादायक... ज्येष्ठ नागरिकाने अंगावर राॅकेल ओतून संपविले जीवन;  आले होते तब्बल एवढे वीजबिल

योगेश बरवड

नागपूर : लॉकडाऊनच्या काळात अवाजवी भरमसाठ वीजबिल पाठविण्यात आल्याची ओरड चांदा ते बांदा अशी संपूर्ण राज्यभरातून सुरू आहे. त्यातच बिलविषयक तक्रारींची दखलच घेतली जात नसल्याने जनमानस प्रक्षृब्ध आहे. एकीकडे लॉकडाऊन आणि कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे रोजगार बुडाले आहेत. हाताला काम नसल्याने जगायचे कसे, हा एकच प्रश्न अनेकांपुढे आहे. त्यातच वीज बिलामुळे अनेक जण त्रस्त आहेत. अशाच एका त्रस्त नागरिकाने टोकाचा निर्णय घेतला.     

वाढीव बिलाचा महावितरणने दिलेला शॉक आणि महावितरणचा दुर्लक्षित कारभार यामुळे व्यतिथ उपराजधानीतील वीजग्राहकाने जाळून घेत आत्महत्या केली. शनिवारी यशोधरानगर हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर जनमानस प्रक्षृब्ध झाले आहे. लीलाधर लक्ष्मण गायधने (५६) रा. पाहुणे ले-आउट असे मृताचे नाव आहे.

त्यांच्या आप्तेष्टांनी दिलेल्या माहितीनुसार, गायधने खासगी काम करायचे. त्यांचे दोन माळ्यांचे स्वतःचे घर आहे. लीलाधर तळमाळ्यावर राहात होते, तर दुसऱ्या मजल्यावर भाडेकरू ठेवले आहेत. त्यांना तब्बल ४० हजारांचे वीजबिल पाठविण्यात आहे होते. 

वारंवार तक्रार करूनही उपयोग नाही


बिलाची रक्कम बघून त्यांना धक्कच बसला. चुकीने अवाजवी बिल पाठविण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे होते. यामुळे महावितरण कार्यालयाकडे तक्रार केल्यात. वारंवार चकरा मारल्या, अधिकाऱ्यांच्या भेटी घेत विनवण्याही केल्या. पण काडीचाही उपयोग झाला नाही. उलट बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला. या प्रकाराने ते कमालीचे व्यथित झाले. यातूनच त्यांनी जास्त दारू पिण्यास सुरुवात केली होती. शनिवारी दुपारी घरासमोरच अंगावर रॉकेल टाकून त्यांनी स्वत:ला पेटवून घेतले. कुटुंबीयांनी धावपळ त्वरित आग विझवून तत्काळ त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.

अधिकाऱ्यांकडून तुसडेपणाची वागणूक


तब्बल ४० हजार रुपये बिल आल्याने गेल्या काही दिवसांपासून गायधने त्रस्त होते. भरमसाठ बिलाचा धसका आणि अधिकाऱ्यांकडून मिळणारी तुसडेपणाची वागणूक यामुळे व्यथीत होऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे आप्तेष्टांचे म्हणणे आहे. तूर्तास यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT